Image
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प
022-22153351
बाब

पॉली हाऊस/ शेडनेट हाऊस मध्ये लागवड साहित्य

आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदाराचा ७/१२ व ८ अ उतारा
  • अर्जदार अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील असल्यास त्याबाबतचा पुरावा
  • अर्जदार दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र

पात्रता निकष

  • प्रकल्पांतर्गत निवड केलेल्या गावासाठीच्या ग्राम कृषि संजीवनी समितीने (VCRMC) मान्यता दिलेले अत्यल्प व अल्प भूधारक शेतकऱ्यांबरोबरच २ ते ५ हेक्टर पर्यंत जमीनधारणा असलेल्या शेतकऱ्यांना, अनु.जाती/ जमाती, महिला, दिव्यांग व इतर शेतकरी या प्राधान्यक्रमाने निवड करून लाभ देण्यात येईल.
  • यापूर्वी शासनाच्या इतर योजनामधून या घटकाचा लाभ घेतलेला असल्यास एकत्रित लाभ ४० गुंठ्याच्या मर्यादेत देता येईल.
  • शेतकऱ्याची स्वत:च्या मालकीची जमीन व पाणी पुरवठ्याची सुविधा आणि विद्युतपुरवठा असणे आवश्यक आहे.
  • या बाबीकरिता इतर योजनेतून शासकीय अनुदान घेतले असल्याचे/नसल्याचे लाभार्थीने हमीपत्राद्वारे प्रमाणित करावे.
  • या योजनेअंतर्गत एका लाभार्थ्यास जास्तीत जास्त ४००० चौ.मी. क्षेत्र मर्यादेपर्यंत लाभ घेता येईल.
  • भाजीपाला पिकांच्या लागवडीसाठी लागवड साहित्य (रोपे) व प्लास्टिक आच्छादन या बाबींसाठी तसेच फुलपिकांच्या लागवडीसाठी फक्त लागवड साहित्य या बाबीसाठी अर्थसहाय्य देय राहील.
  • मार्गदर्शक सूचनेमध्ये नमूद केलेल्या लागवड साहित्याचा लाभ हरितगृह किंवा शेडनेट गृहामध्ये शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सुरवातीला लागवड केलेल्या पिकासाठी एकदाच देय राहील. दुसऱ्यांदा कोणत्याही पिकासाठी प्रकल्प कालावधीमध्ये सदर शेतकऱ्यास पुन्हा लाभ देय राहणार नाही.
  • हरितगृह किंवा शेडनेट गृहामधील प्रत्यक्ष लागवडीखालील क्षेत्रासाठी अनुदान देय राहील.

टीप

  • NA

बाब सूची