Image
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प
022-22153351
बाब

शेडनेट हाऊस

आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदाराचा ७/१२ व ८ अ उतारा
  • अर्जदार अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील असल्यास त्याबाबतचा पुरावा
  • अर्जदार दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र
  • शेडनेट हाऊस संदर्भातील प्रशिक्षण प्रमाणपत्र

पात्रता निकष

  • प्रकल्पांतर्गत निवड केलेल्या गावासाठीच्या ग्राम कृषि संजीवनी समितीने (VCRMC) मान्यता दिलेले अत्यल्प व अल्प भूधारक शेतकऱ्यांबरोबरच २ ते ५ हेक्टर पर्यंत जमीनधारणा असलेल्या शेतकऱ्यांना, अनु.जाती/ जमाती, महिला, दिव्यांग व इतर शेतकरी या प्राधान्यक्रमाने निवड करून लाभ देण्यात येईल.
  • यापूर्वी शासनाच्या इतर योजनामधून या घटकाचा लाभ घेतलेला असल्यास एकत्रित लाभ ४० गुंठ्याच्या मर्यादेत देता येईल.
  • शेतकऱ्याची स्वत:च्या मालकीची जमीन व पाणी पुरवठ्याची सुविधा आणि विद्युतपुरवठा असणे आवश्यक आहे.
  • उभारणी करणाऱ्या सेवा पुरवठादाराकडून मार्गदर्शक सूचनामधील आराखड्यानुसार व तांत्रिक निकषाप्रमाणे साहित्याचा वापर करून उभारणी केलेली असल्याबाबत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे.
  • या योजनेअंतर्गत एका लाभार्थ्यास कमीतकमी ५०० चौ.मी. तर जास्तीत जास्त ४००० चौ.मी. क्षेत्र मर्यादेपर्यंत लाभ घेता येईल.
  • या बाबीकरिता इतर योजनेतून शासकीय अनुदान घेतले असल्याचे/नसल्याचे लाभार्थीने हमीपत्राद्वारे प्रमाणित करावे.
  • प्रती लाभार्थी ४००० चौ.मी. क्षेत्र मर्यादेच्या अधीन राहून यापूर्वी लाभ घेतलेले क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्रासाठी या योजनेचा लाभ घेता येईल.
  • उभारणी मार्गदर्शक सुचनेतील तांत्रिक निकष, आराखडे व दर्जाप्रमाणे करणे बंधनकारक आहे.
  • शेडनेट हाऊस संदर्भातील तांत्रिक प्रशिक्षण अनुदान अदायगी पूर्वी घेणे बंधनकारक राहील.
  • मार्गदर्शक सूचनामध्ये नमूद केल्यानुसार शेडनेट हाऊस प्रकारानुसार, आकारमानानुसार व निश्चित केलेल्या तांत्रिक निकषानुसार उभारणीचा खर्च ग्राह्य धरण्यात येईल.

टीप

  • NA

बाब सूची