Image
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प
022-22153351
बाब

Sprinkler Irrigation

आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदाराचा ७/१२ व ८ अ उतारा
  • अर्जदार अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील असल्यास त्याबाबतचा पुरावा
  • अर्जदार दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र
  • सामुहिक सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास इतर संबधितांचे करारपत्र
  • पाणी व मृद तपासणी अहवाल

पात्रता निकष

  • मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केल्यानुसार निश्चित केलेल्या तांत्रिक निकषानुसार साहित्य असणे आवश्यक आहे.
  • विद्युत पंपाकरिता कायमस्वरूपी जोडणी आवश्यक.
  • ज्या पिकाकरीता संच बसविण्यात येणार आहे त्या पिकाची नोंद ७/१२ च्या उताऱ्यावर क्षेत्रासह असावी. (७/१२ उताऱ्यावर पिकाची नोंद नसल्यास कृषी पर्यवेक्षक यांचेकडून पिक लागवडीचे प्रमाणपत्र घ्यावे)
  • तुषार सिंचन घटकाचे साहित्य बी.एस.आय. (BSI) दर्जाचे असणे आवश्यक आहे.
  • नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत सूक्ष्म सिंचन या योजनासाठी अत्यल्प व अल्प भूधारकांची अनुक्रमे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, दिव्यांग शेतकरी व सर्वसाधारण या प्राधान्यक्रमानुसार लाभार्थी निवड करण्यात येईल.
  • शेतकऱ्याकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध असावी, सामुहिक सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास इतर संबधितांचे करारपत्रक आवश्यक
  • उपलब्ध सिंचन स्त्रोतातील पाण्याचा विचार करून तेवढ्या क्षेत्रासाठी सूक्ष्म सिंचनाचा लाभ देय आहे.
  • विहिर, बोअर, ओवहरहेड टँक, इंजिन/ विद्युतपंपसंच व त्यांचा कोणताही भाग, जनरेटर सेट इ. अनुषंगीक बाबीसाठी अर्थसहाय्य अनुज्ञेय असणार नाही.
  • फिटींग्ज व ॲक्सेसरीज सेटचा उल्लेख असून त्याच्या खर्चाचा एकूण खर्चामध्ये समावेश केलेला आहे. फिटींग्ज मध्ये टी, एल्बो, रेड्युसर, फिमेल थ्रेडेड अडाप्टर, मेल थ्रेडेड अडाप्टर, एन्ड कॅप,नट बोल्ट सह फ्लॅन्ज, सर्व्हिस सॅडल, बेन्ड, जी आय एन निपल, टाल फॅन टॅब, पी व्ही सी सेन्ट्रल जॉईट इ. बाबींचा समावेश होतो.
  • मुख्य पीक व आंतरपिकांत संच बसविला असल्यास शेतकऱ्याच्या पसंती नुसार एकाच पिकास, लॅटरल अंतरगटाच्या निर्धारीत खर्च मर्यादा प्रमाणे अर्थसहाय्य देण्यात येईल.

टीप

  • NA

बाब सूची