Image
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प
022-22153351
बाब

विहिर

आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदाराचा ७/१२ व ८ अ उतारा
  • अर्जदार अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील असल्यास त्याबाबतचा पुरावा
  • अर्जदार दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र
  • भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडे वरिष्ठ भूवैज्ञानिक यांचेकडील पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र

पात्रता निकष

  • प्रकल्पांतर्गत निवड केलेल्या गावासाठीच्या ग्राम कृषि संजीवनी समितीने (VCRMC) मान्यता दिलेले अत्यल्प, अल्प भूधारक शेतकऱ्यांना, अनु.जाती/ जमाती, महिला, दिव्यांग व इतर शेतकरी या प्राधान्यक्रमाने निवड करून लाभ देण्यात येईल.
  • विहित तांत्रिक निकषाप्रमाणे कामे केल्यानंतर मार्गदर्शक सुचनानुसार वित्तीय मर्यादेत अनुदान देय राहील.
  • विहीर घेण्यासाठी एकूण जमिनीचे क्षेत्र ०.४० हेक्टर पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
  • ज्या शेतकऱ्यांकडे संरक्षित सिंचनाची सोय नाही अशा शेतकऱ्यांना लाभ देय आहे.
  • संरक्षित सिंचनाची सोय उपलब्ध असलेले तसेच या घटकाचा इतर कोणत्याही योजनेतून यापूर्वी लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना लाभ देय नाही.
  • लाभार्थी निवड करताना प्रस्तावित नवीन विहीर व पिण्याच्या पाण्याचा सार्वजनिक स्त्रोत यातील अंतर ५०० मीटर पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम २००९ नुसार पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोता व्यतिरिक्त प्रस्तावित विहीर व अस्तित्वात असलेल्या इतर विहिरींचे अंतर १५० मीटर पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
  • गावामधील अस्तित्वातील व प्रस्तावित असे एकूण सिंचन विहिरीची घनता लागवडी योग्य क्षेत्राच्या ८ विहिरी प्रती चौ.किमी पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
  • ग्राम कृषी संजीवनी समितीने मान्यता दिलेल्या लाभार्थ्यांच्या विहिरींसाठी स्थळ निश्चितीसाठी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडे वरिष्ठ भूवैज्ञानिक यांचेकडील पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • भूजल सर्वेक्षण यंत्रणा GSDA च्या व्याख्येप्रमाणे अति शोषित व शोषित पाणलोट क्षेत्रामध्ये वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहिरी घेण्यास महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम २००९ नुसार मनाई आहे.
  • अंशत: शोषित पाणलोट क्षेत्रामध्ये विहीर घ्यावयाची झाल्यास जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक यांच्या सल्ल्याने भूजल पुनर्भरणाच्या अटीवर नवीन सिंचन विहीर घेता येईल.
  • सुरक्षित क्षेत्रात (SAFE ZONE) वैयक्तिक लाभाची सिंचन विहिरीची कामे हाती घेता येऊ शकतात, तथापि GSDA ने विहिरीची मापे निश्चित करणे आवश्यक आहे. असे करताना कठीण खडकातील भागासाठी विहिरीचा व्यास ८ मीटर पेक्षा तसेच मऊ खडक व मातीच्या भागासाठी ६ मीटर पेक्षा जास्त असू नये.
  • नवीन विहीर खोदणे व अन्य बाबींची पूर्तता करण्यासाठी कमाल १ वर्षाचा कालावधी अनुज्ञेय आहे.

टीप

  • NA

बाब सूची