Image
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प
022-22153351
बाब

फळबाग लागवड / वृक्षलागवड

आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदाराचा ७/१२ व ८ अ उतारा
  • अर्जदार अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील असल्यास त्याबाबतचा पुरावा
  • अर्जदार दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र
  • जमीन आरोग्य पत्रिका
  • संयुक्तपणे खातेदार असल्यास सर्व खातेदारांचे संमतीपत्र (फळबाग लागवडीसाठी लागू)
  • जमीन कुळ कायद्याखाली येत असल्यास कुळाचे संमतीपत्र (फळबाग लागवडीसाठी लागू)

पात्रता निकष

  • प्रकल्पांतर्गत निवड केलेल्या गावासाठीच्या ग्राम कृषि संजीवनी समितीने (VCRMC) मान्यता दिलेले अत्यल्प, अल्प भूधारक शेतकऱ्यांना, अनु.जाती/ जमाती, महिला, दिव्यांग व इतर शेतकरी या प्राधान्यक्रमाने निवड करून लाभ देण्यात येईल.
  • प्रकल्पांतर्गत सदर घटकाचा लाभ ५ हेक्टर पर्यंत जमीनधारणा असलेल्या लाभार्थींना देय राहील.
  • प्रकल्पांतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांनाच लाभ देण्यात यावा, संस्थात्मक लाभार्थ्यांना लाभ अनुज्ञेय राहणार नाही. (फळबाग लागवडीकरिता लागू)
  • शेतकऱ्याच्या स्वत:च्या नावे 7/12 उतारा असणे आवश्यक आहे तथापि, जर लाभार्थी ७/१२ उताऱ्यावर संयुक्तपणे खातेदार असेल तर सर्व खातेदारांचे फळबाग लागवडीसाठी संमतीपत्र बंधनकारक राहील. (फळबाग लागवडीकरिता लागू)
  • लागवड करावयाच्या फळपिकासाठी ठिबक सिंचन संचाची उभारणी करण्याकरिता लाभार्थ्याकडे पाणी पुरवठ्याचा स्त्रोत व आवश्यक सुविधा असावी. (फळबाग लागवडीकरिता लागू)
  • जमीन कुळ कायद्याखाली येत असल्यास, 7/12 च्या उताऱ्यावर जर कुळाचे नाव असेल तर योजना राबविण्यासाठी कुळाचे संमतीपत्र आवश्यक राहील. (फळबाग लागवडीकरिता लागू)
  • या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांच्या मालकीची किमान २० गुंठे शेत जमीन असणे बंधनकारक राहील. (फळबाग लागवडीकरिता लागू)
  • ग्राम कृषि संजीवनी समितीने (VCRMC) मान्यता दिलेल्या सार्वजनिक (ग्रामपंचायत व इतर शासकीय) क्षेत्रावर वृक्ष लागवड करता येईल.
  • या घटकाकरिता इतर कोणत्याही योजनेतून लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना या योजने अंतर्गत पुन्हा लाभ मिळणार नाही.

टीप

  • NA

बाब सूची